आळंदी : वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत नगरसेवक प्रशांत कु-हाडे आणि राहूल चिताळकर पाटील यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना काळे फासत धक्काबुक्की केली.
दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. अनधिकृत बांधकामाची नोटीस बजाविल्याच्या रागातून आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप औंधकर यांनी केला आहे. तर औंधकरांमुळे विकास काम खोळंबल्याचा आरोप प्रशांत कु-हाडे यांनी केला.
इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी औंधकर गेले होते. त्याचवेळी प्रशांत कु-हाडे आणि राहूल चिताळकर पाटील काही कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी आले. औंधकर यांना काहींनी हातान पकडून ठेवले. तर काहींनी त्यांच्या तोंडावर शाई टाकली.
औंधकर यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे कपडे फाडत त्यांना जोरदार धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात कु-हाडे आणि चिताळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाच वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.