सांगली : एकीकडे राज्यात अंगणवाडीतील चिक्कीचा कोट्यवधीचा घोटाळा सध्या चर्चेत आहे, मात्र दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये ' आभाळाच्या छताखाली अंगणवाडीचा वर्ग' आहे.
गोंदिरा मळ्यातील अंगणवाडीचे पत्रे वाऱ्याने उडून जाऊन महिना उलटलाय. उघड्या आभाळाच्या छताखाली पावसात चिमुकल्यांना बसायला निवाराही नाही. त्यामुळं पालकांनी आपल्या चिमुरड्यांना अंगणवाडीत पाठवणं बंद केलंय.
छत नसल्यानं पावसामुळं अंगणवाडीतील सर्व कागदपत्रे, दैनंदिनी भिजून गेली असून, खुर्च्या मोडल्यात. लहान मुलांना देण्यासाठी आणलेला औषधांचा साठा खराब झालाय. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.