देहूरोड येथे झालेल्या अपघातात मुंबईकर बाईकस्वार ठार

 जुन्या मुंबई पुणे रोडवर देहूरोड इथं पहाटे झालेल्या विचित्र अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार तर दूसरा गंभीर जख्मी झालाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 27, 2017, 06:30 PM IST
देहूरोड येथे झालेल्या अपघातात मुंबईकर बाईकस्वार ठार   title=

पिंपरी चिंचवड :  जुन्या मुंबई पुणे रोडवर देहूरोड इथं पहाटे झालेल्या विचित्र अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार तर दूसरा गंभीर जख्मी झालाय. 

हा अपघात इतका भयंकर होता की मयत तरुणाच्या डोक्याचा अगदी चुरा झाला. शहाबाज राजमहमद डोंगरे असे ठार झालेल्या ३१ वर्षीय  तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मुंबईचा आहे. 

शहाबाज डोंगरे आणि त्याचा मित्र  दुचाकीवरून मुंबईकडून पुण्याकडे जात होते. देहुरोड जवळ अमरजाई मंदीराजवळ अज्ञात भरधाव वेगात पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली असता चाका खाली आल्यान शहाबाज डोंगरे याचा जागीच मृत्यू झाला... 

त्याची दुचाकी दोनशे फुटापर्यंत फरफटत नेले होते. मात्र पाठीमागे बसलेला हसन अश्रफ अब्दुल याचे नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला.

 दरम्यान हा अपघात पाहून भेदरलेला दुसरा दुचाकीस्वार ही ताबा सुटल्याने या गाडीवर जाऊन आदळला. त्यात एक जण गंभीर जखमी झाले तर दुसरा एक जण जखमी झालाय.