खंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!

खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय. 

Updated: Dec 26, 2014, 01:20 PM IST
खंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम! title=

पुणे : खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय. 

भरधाव वेगानं येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन बस एकमेकींवर आदळल्यात. या अपघातात सात जण जखमी झालेत. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक गेल्या काही तासांपासून पूर्ण ठप्प आहे...  

महत्त्वाचं म्हणजे जिथे हा अपघात झाला त्या ‘लेन नंबर एक’ मधून बसेसना परवानगी नसतानाही तिथून बसेस जातात. त्यामुळं ही वाहतूक बंद करावी अशी मागणी आता होऊ लागलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.