पालघर-वरई फाट्याजवळ भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू

पालघर- मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरई-सफाले रोडवर गुंदावे इथं 

Updated: Jun 8, 2015, 11:06 AM IST
पालघर-वरई फाट्याजवळ भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू title=

पालघर: पालघर- मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरई-सफाले रोडवर गुंदावे इथं 

भीषण अपघात घडलाय. या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे.

पहाटे साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला. सर्व मृत नावझे गावातील रहिवासी आहेत. 

गरोदर महिलेच्या पोटात दुखत असल्यानं तिला मॅजिक गाडीतून दवाखान्यात नेत होते. पालघरच्या वरई-सफाले रस्त्यावर ट्रक उभा होता. कारनं उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि अपघात झाला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.