प्रशासनाची चुकी, आईचा अपघाती मृत्यू आणि मुलीवरच गुन्हा

कल्याण-कर्जत महामार्गावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी स्लीप झाल्यानं रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असताना आता याप्रकरणी दुचाकी चालवणारी त्यांची मुलगी प्रीती हिच्यावर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघातास जबादार असणाऱ्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंबरनाथ सीटिझन फोरमची मागणी आहे.

Updated: Sep 23, 2015, 08:45 PM IST
प्रशासनाची चुकी, आईचा अपघाती मृत्यू आणि मुलीवरच गुन्हा  title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ: कल्याण-कर्जत महामार्गावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी स्लीप झाल्यानं रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असताना आता याप्रकरणी दुचाकी चालवणारी त्यांची मुलगी प्रीती हिच्यावर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघातास जबादार असणाऱ्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंबरनाथ सीटिझन फोरमची मागणी आहे.

दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावर दुचाकी खड्ड्यात स्लीप झाल्यानं रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. रीटा आणि त्यांची मुलगी प्रीती या २६ जुलैला रात्री आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला होता. या अपघातात रीटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्या पाच दिवस कोमात असताना त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून ती सावरत असताना प्रीतीच्याच विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

आणखी वाचा - एका शाळेत ट्रॅक्टर घुसले

अंबरनाथ शहरातील जय अंबे हॉटेल जवळून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचं साम्राज्य आहे. या अपघाता प्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. प्रीतीचे वडील हे नेव्हीमध्ये असून सध्या त्यांची पोस्टिंग ही बिहार इथं आहे. ते अंबरनाथला आल्यावर महामार्ग संबंधी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं अंबरनाथ सीटिझन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या अपघातानंतर आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून कशीबशी सावरलेली प्रीती ही आपल्यावरच गुन्हा दाखल झाल्यानं मानसिक तणावखाली आहे. 

आणखी वाचा - माणसाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.