पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

 ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

Updated: Feb 8, 2017, 10:01 AM IST
पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन! title=

भंडारा : ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय तर पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलीय.

30 जानेवारीला तुमसरमध्ये हेमंत उके याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संतोष डहाट, अमन मेश्राम, कैलास साठवणे, निशिकांत राऊत, प्रशांत गाभने यांच्यासह आणखी दोघांना अटक केली होती.

हे सगळे पोलीस कोठडीत असताना प्रशांत गाभने याचा सोमवारी वाढदिवस होता. पोलीस कोठडीत पोलिसांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.