तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती. 

Updated: Aug 25, 2014, 09:31 AM IST
तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू title=

रत्नागिरी: कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती. 

रात्री उशीरा मालगाडीचे सर्व डबे बाजूला काढण्यात यश आलं. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय. 

दरम्यान, वाहतूक सुरू झाली असली तरी काही गाड्या रद्द तर काहींचा रूट बदलण्यात आलाय.

कोणत्या गाड्या रद्द

  • 12051/12052 जनशताब्दी एक्स्प्रेस
  • 10103/10104 मांडवी एक्स्प्रेस
  • 50105/50107 आणि 50106/50108 दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर (अप आणि डाऊन दोन्ही)

मार्ग बद्दललेल्या रेल्वे गाड्या

  • 12432 राजधानी एक्स्प्रेस 24 ऑगस्टला निघालेली
  • 12742 पाटना-वास्को एक्स्प्रेस 23 ऑगस्टची
  • 19260 भावनगर-कोच्चुवेली एक्स्प्रेस 24 ऑगस्टला निघालेली 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.