भाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. 

Updated: Jul 16, 2014, 10:08 PM IST
भाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू title=

नागपूर: भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. 

निवडणुकीत वरून उमेदवार लादण्याच्या प्रथेला आपला कडाडून विरोध आहे, असं नागपुरातल्या काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दिल्लीहून आलेल्या निरिक्षकांना सांगितलं. तसंच नेता पुत्रांच्या उमेदवारीलाही विरोध करण्यात आलाय. प्रसंगी स्थानिक नेते नाराज झाले तरी चालतील पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

नागपूरात आलेले पक्षाचे पर्यवेक्षक आपला संकलित अहवाल पक्ष श्रेष्ठींना देतील आणि त्यानंतरच उमेदवार ठरवण्याची ही प्रक्रिया पुढे जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.