एसटीच्या भाड्यात लुटा, विमान प्रवासाचा आनंद

Updated: Dec 15, 2015, 06:02 PM IST
एसटीच्या भाड्यात लुटा, विमान प्रवासाचा आनंद title=

अहमदनगर : एसटीच्या भाड्यात विमान प्रवासाचा आनंद कसा शक्य आहे?, याचं आश्चर्य तुम्हाला नक्की वाटत असेल, पण एसटी महामंडळातील एक वाहक तुम्हाला विमान प्रवासाचा अनुभव देणार आहे.

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

एका प्रवाशाला प्रवासात वाहकाशी भांडण करून डोकेदुखी करून घ्यायची नसते, आणि झालीच तर तो लाल डब्याचा प्रवास ठरतो, पण तुम्हाला सन्मानजनक वागणूक आणि तुमची अडचण समजून घेणारा वाहक असेल, तर एसटीचा प्रवासही तुम्हाला विमानाचा प्रवास वाटतो.

श्रींगोदा आगाराचे वाहक सोपान जवणे हे प्रवाशांना नेमका एसटीच्या भाड्यात विमान प्रवासाचा आनंद कसा देतात, हे पाहणंही तसं औत्सुक्याचं आहे, आणि हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.