एका ड्रेनेजमध्ये दिसली मगर, नागरिकांत घबराट

प्राणीसंग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय..

Updated: Dec 15, 2015, 05:46 PM IST

संजय पवार, झी मीडिया, सोलापूर :  प्राणीसंग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय.. दुस-यांदा असा प्रकार घडल्यानं येथील नागरीकांमध्ये संतापाचं वातावरण आहे..

सोलापूरचं हे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय गलथान कारभारामुळे पुन्हा चर्चेत आलंय.. येथील स्मशानभूमी नाल्याजवळ ड्रेनेज साठी केलेल्या खोदकामाच्या डबक्याबाहेर स्थानिकांना मगर दिसली.. लोकांनी आरडा ओरडा करताच मगर डबक्यात दिसेनासी झाली..

मगर दिसल्याची वार्ता परिसरात वार्‍यासारखी पसरली. प्राणीमित्र आणि महानगरपालिका कर्मचार्‍यांनी इकडे धाव घेतली. ही मगर नाल्याच्या बाजूला असलेल्या डबक्यातून बाहेर आली होती. या परिसरातील ड्रेनेजच्या कामासाठी हे डबके खोदले गेले होते. मगरीला बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांनी मोटार लावून पाण्याचा उपसा केला मात्र मगर काही वर आलीच नाही. प्राणिमित्रांनीही तिचा बराचवेळ शोध घेतला, मात्र त्याचा कहीहि उपयोग झाला नाही...

दोन वर्षांपूर्वी याच प्रनिसंग्रहालायातून मगरी ड्रेनेज वाटे बाहेर पडल्या होत्या.. या प्राणी संग्रहालयाच्या चारही बाजूला वसाहत आहे.. आता पुन्हा संग्रहालयाबाहेर मगर दिसल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय..