मोदींना अजितदादांचे थेट आव्हान...

  मुख्यमंत्री तुम्ही काय पंतप्रधान आले तरी पिंपरी चिंचवडमधून मला कोण उखडून टाकू शकणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2017, 07:29 PM IST
 मोदींना अजितदादांचे थेट आव्हान...  title=

पिंपरी चिंचवड :   मुख्यमंत्री तुम्ही काय पंतप्रधान आले तरी पिंपरी चिंचवडमधून मला कोण उखडून टाकू शकणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

अजित पवारांच्या सभेतील ठळक मुद्दे 

भाजप सेनेच्या हातातली कोणती महापालिका आहे जिथं पिंपरी चिंचवडपेक्षा जास्त विकास दाखवावा, मुंबई नागपूरची अवस्था बघा आणि त्यानंतर आम्हाला  बोला                        

- पिंपरी चिंचवड चा लौकिक गेला म्हणून टीका करताय ,शहर रोड पती होणार टीका करताय, मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही, निकालानंतर भाजप रोड पती झाल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्र्यांवर अजित पवार यांची जोरदार टीका...मते मागायला येता आणि शहराची बदनामी करता हे आपल्याला शोभत नाही                        

- शास्ती कर रद्द केल्याचा जी आर तांत्रिक कारणामुळे अपलोड झाला नाही असे मुख्यमंत्री सांगतात, आम्ही काय दुधखुळे आहोत का...?                        

- माझ्या बरोबर गाडीत फिरा मुख्यमंत्री मग शहरासाठी काय केलंय ते बघा आणि मग बोला...!                        

- अनेक गुंडांना प्रवेश देताय आणि पारदर्शकता बोलताय, ही तुमची पारदर्शकता आहे का, उमेदवारीसाठी पैसे घेताय ही पारदर्शकता का - अजित पवार                        

- कायदा सुव्यवस्थेवरून ही मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट...!                        

- अहमदनगर मध्ये झालेल्या दारू पार्टीवरून ही अजित पवार यांची भाजप सेनेवर टीका...सत्तेसाठी लोकांना काय पाजताय..!

- पक्ष सोडून गेलेल्या लक्ष्मण जगताप, आझम पानसरे, महेश लांडगे यांच्यावर ही टीका...सरकार पडेल या भीतीने त्यांनी देव पाण्यात ठेवलेत, त्यांच्या पोटात गोळा उठालाय, निवडणुका लागल्या की त्यांना कळेल मी काय आहे - अजित पवार
महापालिका निवडणुका च्या जाहिरातीत भाजप पंतप्रधानांचा चेहरा वापरतेय, ते काय महापालिका चालवायला येणार नाहीत, इथं इथलेच काम करणार आणि मी त्यांच्याकडून काम करून घेणार...! - अजित पवार

 - मी राज्यावर कर्ज केले म्हणून टीका करताय, अहो गुजरात पेक्षा कमी कर्ज आहे आपल्यावर, मी सभागृहात आकडेवारीने सिद्ध केलंय, तेव्हा तुम्ही शांत बसला होता.