लोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक

राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय. 

Updated: Feb 15, 2017, 07:22 PM IST
लोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक  title=

जालना : राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय. 

पैशांचं वाटप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाथा खवल असं पकडण्यात आलेल्या व्यक्तीच नाव आहे. 

त्याला पैशाचं वाटप करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी खवलची झडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून १ लाख ३० हजारांची रक्कम आढळून आली. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम कडपेंनी भाजप उमेदवार राहुल लोणीकर सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केलाय. 

तर राहुल लोणीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्या खिशात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी बळजबरीने पैसे टाकल्याचा आरोप केलाय.