पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केलंय..
एकही काळा पैसावाला, मोठे उद्योजक रांगा मध्ये दिसत नाहीत, रांगा मध्ये सर्वसामान्य आहेत, त्यात 88 जणांना प्राण गमवावा लागलाय, त्याला जबाबदार कोण असा सवाल करत आता 302 कोणावर लावायचा असा टोला ही लगावला..राज्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर केलेल्या टिप्पणी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचं पवार म्हणाले..
ते पिंपरीत बोलत होते.अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर ही जोरदार टीका केली.. विजय चौधरीला दिलेलं नोकरीच आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत म्हणूनच ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेला हजर राहिले नाहीत असा आरोप पवारांनी केला.
मेट्रोच्या मुद्द्यावर ही अजित पवार यांनी टीका केली. मेट्रो निगडी ते स्वारगेट हवी असंही पवार म्हणाले.