'नको त्या गोष्टी केल्यामुळे अशोक चव्हाणांना घरी बसावं लागलं'

राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणुक प्रचारादरम्यन कलगीतुरा रंगतांना दिसत आहे.

Updated: Dec 17, 2016, 05:05 PM IST
'नको त्या गोष्टी केल्यामुळे अशोक चव्हाणांना घरी बसावं लागलं' title=

नांदेड : राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणुक प्रचारादरम्यन कलगीतुरा रंगतांना दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याएवजी अशोक चव्हाणांनी नको त्या गोष्टी केल्या म्हणून त्यांना घरी बसावं लागलं अश्या शब्दात अजीत पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली आहे.

काचेच्या घरात राहणा-यांनी राष्ट्रवादीवर आरोप करु नयेत नाहीतर आम्ही जर दगड मारला तर सगळं घर कोलमडुन पडेल अश्या शब्दात अजीत पवारांनी अशोक चव्हाणांना सज्जड दमच दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त आलेले राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर चांगलीच आगपाखड केली आहे. सेना-भाजप-आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप चव्हाणांनी केला होता, त्याला प्रतिऊत्तर देतांना अजीत पवारांनी चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला.