युवकाचं अनैसर्गिक लैंगिक शोषण, स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड

अकोल्यातील नावाजलेल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवांविरोधात अनैसर्गिक बलात्काराचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आलाय. राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारी काम करणाऱ्या एका तरुणानं हा आरोप केलाय. 

Updated: Jul 7, 2015, 06:10 PM IST
युवकाचं अनैसर्गिक लैंगिक शोषण, स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड   title=

अकोला: अकोल्यातील नावाजलेल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवांविरोधात अनैसर्गिक बलात्काराचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आलाय. राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारी काम करणाऱ्या एका तरुणानं हा आरोप केलाय. 

त्यानं यावेळी पुराव्यादाखल लैंगिक शोषणाच्या स्टिंग ऑपरेशनची चित्रफितच पत्रकार परिषदेत सदर केलीय. गेल्या सात वर्षांपासून नोकरीत कायम करण्याच्या आमिषानं या दोघांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यानं केलाय. 

संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगठा यांच्यावर झालेल्या आरोपानं अकोल्याच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. संस्थेच्या विद्यामंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक गणपतराव आंबिलवादे यांनी या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. 

यासंदर्भात आम्ही निरंजनकुमार गोयंकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा फोन बंद होता. तर जुगलकिशोर रुंगठांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आरोप निराधार असल्याचं सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.