जयेश जगड सह ब्युरो रिपोर्ट ,झी मिडिया, अकोला : अकोल्यामध्ये एक नवा विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आलीय. आणि हा विश्वविक्रम करणारा आहे एक केशकर्तनकार.. नाव आहे शिवा खापरकर.. शिवाने एकाच वेळी तब्बल 11 कात्र्यांचा वापर करुन कटींग केलीय.. पाहुया याबाबतचा एक रिपोर्ट..
शिवा खापरकर.... सातत्याने नित्यनव्याचा शोध घेणारा अकोल्यातील एक केशकर्तनकार.. शिवानं एक नव्हे दोन नव्हे तर 11 कात्र्या एकत्रित धरुन केसकापण्याचा विक्रम केलाय..
याआधी शिवा खापरकर यांनी 2012 मध्ये 20 तासात 407 कटींगचा विक्रम करीत 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव कोरलेय. आणि त्यानंतर शिवाला वेध लागले गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे.. याआधी जपानच्या गुण करोना याने 10 कैचांनी केलेल्या कटींगची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने केली. त्यामुळे अकोल्याच्या शिवा खापरकरने 11 कैच्यांचा वापर करुन हेअर कटिंग करत जपानी केशकर्तकाराचा विश्वविक्रम मोडण्याचा दावा 'गिनीज बुक'कडे केलाय.
हा विक्रम साकारण्यासाठी शुभेच्छा द्यायला अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आणि महापौर उज्वला देशमुख शिवाला उपस्थित होते.या विक्रमाचे परिक्षण करण्यासाठी अकोल्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.
याआधीही शिवाने चालता-चालता कटींग करणे, डोळे बांधून कटींग करणे यातून आपले वेगळेपण सिद्ध केलेय. यावेळे 11 कात्र्यांचा उपयोग करून दोन जणांची कटींग करीत शिवाने अकोल्यात हा विक्रमाला गवसणी घातलीय..
या विक्रमाचे संपूर्ण छायाचित्रण 'गिनीज बुक'कडे लवकरच पाठविण्यात येणार असून त्यानंतर शिवाच्या या विश्वविक्रमावर गिनीजबुकडून शिक्कामोर्तब होईल.शिवाला नवीन विक्रमासाठी 'झी मिडिया'च्या शुभेच्छा!..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.