अंगणेवाडी: लाखो भक्तांच श्रध्दास्थान असलेल्या कोकणातल्या आंगणेवाडी जत्रेला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रच नाही तर देशभरातून लाखो भाविक श्री भराडीदेवीच्या दर्शनाला गर्दी करतात.
कोकणच्या सांस्कृतीक वैभवाच दर्शन घडवणारी आंगणेवाडीची जत्रा म्हणजे कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाची.विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह लोखोंच्या संख्येनं सर्वसामान्य भाविक इथ गर्दी करतात.
प्रथेप्रमाणे गावपारध होते देवीला कौल लावला जातो आणि नंतर ठरलेली यात्रेची तारीख वा-याच्या वेगानं सगळीकडे पसरते. दोन दिवस चालणा-या आंगणेवाडीच्या यात्रेत श्रध्देचा महापूर लोटला आहे.