नाशिक : सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले आणि दुकान पेटवून दिले. दरम्यान, येथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.
गेले अनेक दिवसांपासून दारुबंदीची मागणी महिलांकडून करण्यात येत होती. मात्र, महिलांच्या या मागणीकडे कोणीही लक्ष देत नव्हते. अखेर संतप्त महिलांनी दुकानावर धाड टाकली आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.
मळगावातील सर्व महिला एकवट्या आणि दारु दुकानावर धडक दिली. महिलांनी दारुच्या बाटल्या फोडून दुकानाला आग लावून दिली. काही वेळातच दुकानाची राखरांगोळी झाली.
संतप्त महिलांना आवरणे कठिण झाल्यामुळे पोलिसांना पाचारण केली. मात्र, त्यांचाही टिकाव लागला नाही. परिस्थिती हाताबाहेर जाईल या भितीने तेथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.
दरम्यान, नंतर संतप्त महिलांचा शहरातील तहसीलदार कार्यालयाजवळील राज्यमार्गावर रास्तारोको सुरु केले. यावेळी राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आले.