'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले

अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.

Updated: Apr 9, 2016, 11:33 PM IST
'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले title=

पुणे : अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.

भारत माता की जय आणि जय हिंद हे म्हणायला मला कसलीच लाज वाटत नसल्याचही त्यांनी सांगितलं. जे लोक याच्या विरोधात बोलतायंत त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असंही ते म्हणाले. 

पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशनच्या वतीने प्राईड ऑफ पुणे पारितोषिकांच वितरण करण्यात आलं. त्यावेळी अनुपम खेर बोलत होते.