आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान संतोष यांच्या सर्जा जोडीला

श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या संतोष दगडू वहिले यांच्या सर्जा राजा बैलजोडीला मिळालाय. आळंदीमध्ये सर्जा राजा बैलाची मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली. माउलींच्या पालखीचं येत्या २७ जूनला प्रस्थान होतंय. 

Updated: Jun 16, 2016, 11:46 PM IST
आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान संतोष यांच्या सर्जा जोडीला title=

पुणे : श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या संतोष दगडू वहिले यांच्या सर्जा राजा बैलजोडीला मिळालाय. आळंदीमध्ये सर्जा राजा बैलाची मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली. माउलींच्या पालखीचं येत्या २७ जूनला प्रस्थान होतंय. 

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस पूर्ण करणाऱ्या पालखी सोहळ्याची लाखो वैष्णव वाट पाहतायेत. येत्या २७ तारखेला हा सोहळा सुरु होतोय. या सोहळ्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे बैल जोडीचा मान. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्‍हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान वहिले कुटुंबियांना मिळालाय.

हा मान म्हणजे सुद्धा साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी असते… म्हणूनच या बैल जोडीला विशेष महत्व असतं. बैल जोडी आळंदीत दाखल झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते… वहिले कुटुंबियांना हा मान मिळाल्यानंतर त्यांनी ही मोठ्या श्रध्देन बैलांची मिरवणूक काढली…! हा मान मिळाल्याने कुटुंबीय भलतेच खुश आहेत.

वहिले यांनी १ लाख ५१ हजार रुपयांना  ही जोडी खरेदी केलीय. या जोडीची विशेष काळजी ते घेतायेत…! सावळ्या विठ्ठलाची सेवा करण्याची प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते, वहिले कुटुंबीय त्याला अपवाद नाही… म्हणूनच आता वहिले कुटुंबियांनाही लाखो वैष्णवाप्रमाणे आस लागलीय ती पालखी प्रस्थानाची.