ही अशोक सादरे यांनाच दोषी ठरवण्याची तयारी?

निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे प्रकरणाचा चौकशी अहवाल आपणाकडील नसल्याचं नाशिकच्या आयजींनी स्पष्ट केले आहे. मात्र सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या आठ पानी माहितीत, अशोक सादरे यांची आता पर्यंतच्या सर्व चुकांचा पाढा मांडण्यात आला आहे. या माहितीवरून प्रश्न निर्माण होतं आहे की, अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात पुन्हा अशोक सादरे यांनाच दोषी ठरवलं जाणार की काय?

Updated: Oct 26, 2015, 12:28 AM IST
ही अशोक सादरे यांनाच दोषी ठरवण्याची तयारी? title=

जळगाव : निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे प्रकरणाचा चौकशी अहवाल आपणाकडील नसल्याचं नाशिकच्या आयजींनी स्पष्ट केले आहे. मात्र सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या आठ पानी माहितीत, अशोक सादरे यांची आता पर्यंतच्या सर्व चुकांचा पाढा मांडण्यात आला आहे. या माहितीवरून प्रश्न निर्माण होतं आहे की, अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात पुन्हा अशोक सादरे यांनाच दोषी ठरवलं जाणार की काय?

जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांनी आपल्याला या अहवालाविषयी काहीही माहित नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  अशोक सादरे यांच्यावर वाळू माफिया सागर चौधरीकडून खंडणी मागण्याचा आरोप होता, यावरून अशोक सादरे यांना अटक होणार होती, त्याआधी त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या पत्रात एसपी सुपेकर, एलसीबीचे अधिकारी रायते यांच्यावर आरोप केले होते.

यावरून जळगावचे एसपी सुपेकर, पीआय रायते यांची चौकशी सुरू आहे, मात्र ही चौकशी निष्पक्ष होणार की नाही, याविषयी जळगाव शहरात चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.