कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम सध्या सुरू आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेना सत्तेत सहभागी असल्याने त्यांनी समझौता एक्स्प्रेस बंद करून दाखवावी, एवढंच नाहीतर ज्या मंदिर मुद्यासाठी हजारो लोकांचा जीव गेला, ते मंदिर उभारण्यास भाजपला सांगावे, असा टोलाही राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र संग्राहलय उभारणार असल्याचंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.