लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर

प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

Updated: Jul 15, 2015, 07:09 PM IST
लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर title=

मुंबई : प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक विधान परिषदेत मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. दोन्ही सभागृहात मान्यता मऴाल्यानंतर या कायद्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

या कायद्यात ११० सेवांचा समावेश करण्यात आला आहे. नजीकच्या काळात याची संख्या वाढेल. या कायद्यामुळे लोकांना मिळणाऱ्या सेवा या जास्त जलद होतील आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल. याचसोबत प्रशासनात पारदर्शकता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.