आक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये

शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली. 

Updated: Jul 15, 2015, 04:39 PM IST
आक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये title=

बुलढाणा : शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली. 

शेगाव येथे व्हॉट्सअॅप ग्रुपवर जातीय तेढ़ निर्माण करणाऱ्या क्लिपिंग आणि फ़ोटो अपलोड केल्या प्रकरणी ग्रुप एडमिनसह अपलोड करणाऱ्या दोघाविरुद्ध शेगाव शहर पोलीसांनी काल १४ जूलै उशिरा रात्री गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह फोटो या ग्रुपवर पोस्ट करण्यात आले होते.  ग्रुप सदस्य शेख सलीम शेख उमर यांच्या तक्रारीवरुन ग्रुप एडमिन शेख सलमान शेख रहीम याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही नागपूरमध्ये ग्रुप मेंबरने असेच ग्रुप अॅडमिनला जेलमध्ये पाठवलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.