अमरावती : अमरावतीत वडाली भागात परिहारपूरा भागात सुरु असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड़ टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारू विक्रेते आणि त्यांच्या सहका-यांनी हल्ला चढवला.
या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली. सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती अमरावती पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिकांनी दिली.
विशेष म्हणजे पोलीस पथकावरिल हल्ल्यात पुढाकार घेणा-या एका राज्य राखीव दलाच्या जवानाला या घटनेत आरोपी करण्यात आलंय.