औरंगाबाद: स्कॉर्पियो-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जण ठार, ३ जखमी

कन्नड तालुक्यातील हतनुरजवळ स्कॉर्पियो अणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  ७ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झालेत. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. 

Updated: Apr 5, 2015, 09:12 AM IST
औरंगाबाद: स्कॉर्पियो-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जण ठार, ३ जखमी title=

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील हतनुरजवळ स्कॉर्पियो अणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  ७ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झालेत. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. 

हे सर्व गोव्याला फिरायला गेले होते. अपघातानंतर या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्कॉर्पियो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे स्कॉर्पियोचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. जखमी झालेल्या चौघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळं धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.