लष्कराच्या हद्दीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादजवळील सुंदरवाडी शिवारातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेला महिनाही उलटत नाही तोच पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडलीय. 

Updated: Sep 22, 2015, 11:20 AM IST
लष्कराच्या हद्दीत तरुणीवर सामूहिक बलात्कार title=

औरंगाबाद : औरंगाबादजवळील सुंदरवाडी शिवारातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेला महिनाही उलटत नाही तोच पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडलीय. 

धक्कादायक म्हणजे, ज्या परिसरात ही घटना घडली तो परिसर लष्कराच्या हद्दीत येतो. शहराच्या तिसगाव शिवारात एक 17 वर्षीय मुलगी सामूहिक अत्याचाराची शिकार ठरलीय. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय. 

सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. साजापूरमध्ये राहणारी ही अल्पवयीन मुलगी बजाजनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मित्रासोबत या परिसरात फेरफटका मारण्यासाठी आली होती. तिसगाव शिवारात ए एस क्लब परिसरात हे दोघे बसले असताना अचानक तीन तरुण तिथ दाखल झालेत. 

काही कळायच्या आतच त्यांनी तरुणाला मारहाण सुरू केली. या मारहाणीत मुलीचा मित्र गंभीर जखमी झालाय... त्यानंतर त्यांनी तरुणीला उचलून जवळच्याच एका तळ्याजवळ नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मुख्य रस्त्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर हे तळं आहे. जखमी अवस्थेत असलेला तरुणीचा मित्र कसाबसा मुख्य रस्त्यावर आला. वाहनांना थांबवून त्यानं मदत मागण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी, बजाजनगरहून कंपनीतून परतणाऱ्या काही कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली... धास्तावलेल्या तरुणीला त्यांनी आधार दिला.
 
काही मिनिटांतच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस आरोपींना शोधण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.