औरंगाबादेत विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार

औरंगाबादेत आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती, तेव्हा विनाअनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

Updated: Oct 4, 2016, 06:50 PM IST
औरंगाबादेत विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार title=

औरंगाबाद : औरंगाबादेत आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती, तेव्हा विनाअनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

मोर्चातील काही लोकांकडून दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांच्या लाठीमारात दोन विनाअनुदानित शिक्षक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी का अचानक लाठीमार केला हे लक्षात आलं नसल्याचं काही शिक्षकांनी म्हटलं आहे, महिला शिक्षकांनाही लाठीमार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दगडफेकीत पोलिसही किरकोळ जखमी झाले असल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणी ९ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x