नवी मुंबई : केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणार्या बाबाचा दरबार नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावलाय.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केट आवारात हा दरबार भरला होता. या दरबरच्या आयोजन करणाऱ्यावर वीना परवाना आयोजन करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी पोलीस आणि एपीएमसी प्रशासनाने परवानगी नाकारली होती. केवळ तीन वेळा पाणी पाजून मधुमेह, पक्षघात, थायरॉईडसारखे आजार बरा करण्याचा दावा श्री राधेकृष्णाजी महाराज ऊर्फ पानीवाले बाबाने केल्याने या बाजार आवारात नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
मध्यवर्ती सुविधागृह इमारतीजवळ 'रोगमुक्त हो सभी, बाबा का संकल्प यही'चा नारा देत हे नि:शुल्क शिबिर भरविले होते. पाणीवाला बाबाच्या कार्यक्रमासाठी एपीएमसी प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही हे शिबीर झाले. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून विनापरवाना कार्यक्रम आयोजीत केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय .
पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणारा हा बाबा अंधश्रद्धा फैलावत असून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या बाबाविरोधात काही पुरावे आढळले तर संबंधितांवर जादूटोणा कायदा, ड्रग अँड मॅजिक अँक्ट, मेडीकल प्रॅक्टीशनर्स अँक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.