ठाणे : पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आली आहे. दरम्यान, यात एका स्थानिक राजकीय नेत्याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तो फरार आहे.
जादूटोणा करुन कोटय़वधी रुपयांचा पाऊस पाडण्याचे भोंदूबाबाने सांगितले. मात्र, त्यासाठी लांब केसांच्या आणि अंगावर डाग नसलेल्या अविवाहित मुलीची गरज आहे. या मुलीशी बाबा निकाह करीन आणि पाऊस पडल्यानंतर तलाक देईन, असे या भोंदूने सांगितले. मात्र, मुलीवर या भोंदूबाबने लैंगिक अत्याचार केले.
भिवंडी येथील नागाव परिसरात पीडित मुलगी राहत असून तिचे वडील हातमाग कामगार आहेत. तिच्या कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे अरुण घाडगे आणि आनंद पन्ना दोघांनी तिच्या वडिलांना सलीम अन्सारी या बाबाची माहिती दिली. हा बाबा जादूटोण्याने पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगितले.
अल्पवयीन मुलीच्या बापाने कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी त्याला स्वत:च्या मुलीला तयार करण्यास सांगितले. पैशांच्या पावसामुळे गरिबी दूर होणार असल्याने त्याने मुलीला तयार केले. ठरल्याप्रमाणे निकाह झाला आणि पाऊस पडण्यासाठी विधी सुरू करण्यात आला. मात्र, वेळ निघून गेल्याने दुसऱ्या दिवशी पाऊस पाडू, असे सांगत सलीम याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर पीडित मुलगी घरी निघून गेली. या घटनेनंतर दोन ते तीन दिवस सलीम आलाच नाही. त्यामुळे तिने सलीमचा शोध घेऊन तलाक घेतला. तरीही सलीम तिला पत्नी म्हणून राहण्यासाठी धमक्या देत होता. ही बाब तिने मामा आणि भावाला सांगताच त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी बलात्कार, जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा सलीम, मित्र अरुण घाडगे, आनंद पन्ना, मौलाना सय्यद रेहाना रजा आदींना अटक करण्यात आली आहे आहे. यातील सहभागी अन्य फरार लोकांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.