बीसीजी लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण

बीसीजीची लस दिल्यानंतर दोन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडलीय. 

Updated: Jul 9, 2015, 02:04 PM IST
बीसीजी लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण title=
प्रातिनिधिक फोटो

गोंदिया : बीसीजीची लस दिल्यानंतर दोन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडलीय. 
 
यामुळे, संतापलेल्या नातेवाईकांनी आरोग्य कर्मचार्‍यांना मारहाण केली असून  बाळाच्या मृत्यूस आरोग्य कर्मचारीच जबाबदार असल्याची तक्रार पालकांनी रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. गोंदिया जिल्यातील चंगेरा गावात ही घटना घडलीय.
   
चंगेरा येथील जमील बेग मिर्झा यांनी आपल्या बाळाला अंगणवाडीत लस  देण्यासाठी नेले होते.  बीसीजीचा टिका लावल्यानंतर त्याला घरी नेण्यात आले. त्यानंतर बाळाची प्रकृती बिघडली.  यानंतर संबधित डॉक्टरने बाळाला बाई गंगाबाई रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, नातेवाईकांनी मध्यप्रदेशच्या रजेगाव येथील दवाखान्यात नेले. मात्र तोपर्यंत बाळाचे शरीर निळे पडले होते... हॉस्पीटलमध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.

दरम्यान, पोष्टमार्टम रिपोर्ट आल्याशिवाय मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार नाही, असं संबंधित डॉक्टरांनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.