CCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप

दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.

Updated: Jul 9, 2015, 02:13 PM IST
CCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप title=

नाशिक : दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.

नाशिकच्या वडाळा नाका परिसरातल्या जोया मुकद्दर खान या तीन वर्षांच्या चिमुकलीचा आयुष्याचा 'तो' दिवस अखेरचा दिवस ठरला असता. मात्र, तीनं साक्षात मृत्यूलाच परत पाठवलं. 

झोया आईच्या मागे-मागे घरातून बाहेर पडली होती.. मात्र, याची पुसटशी कल्पानाही तिच्या आईला नव्हती.... आणि अचानक रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या गाडीच्या चाकाखाली झोया गेली. गाडीचं पुढचं आणि मागचंही चाक जोयाच्या अंगावरून गेलं. 

पुढं गेलेल्या आईला काहीतरी घडल्याची जाणीव झाली. तीनं मागं वळून पाहिलं तर जोयाच्या अंगावरून गाडी गेली होती. आईच्या अंगाचा थरकाप उडाला आणि ती धावत जोयाला उचलायला गेली. तर तीही झालेल्या प्रकार पाहून अवाक् झाली. 

मात्र हा एका आईसाठी सर्वात मोठा सुखद धक्काच होता. कारण जोया पूर्णपणे सुखरूप होती. तिच्या पोटाला केवळ छोटीशी जखम झाली होती. प्रत्यक्षदर्शींसह डॉक्टरही या सर्व प्रकारनं आश्चर्यचकीत झाले आहेत. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.