घराच्या स्वप्नासाठी ६७ वर्षीय महिला धावली...

एक ६७ वर्षीय स्त्री आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी किती प्रयत्न करते

Updated: Jan 4, 2016, 07:02 PM IST

बारामती : एक ६७ वर्षीय स्त्री आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी किती प्रयत्न करते याचे मूर्तीमंत उदाहरण बारामती येथील शरद मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून पहायला मिळालं...

कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अनवाणी पायांनी एक ६७ वर्षाची आजी धावत होत्या, धावण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती,  मात्र वयोमानानुसार शारिरीक थकवा असूनही आपल्या  कुटुंबाला स्थेर्य मिळावे यासाठी त्या बारामती येथील शरद मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या… 

२०१३ साली पतीच्या उपचारासाठी स्पर्धेत भाग घेऊन धावल्या आणि विजयीही झाल्या एक वृध्द महिला आपल्या पतीच्या उपचारासाठी स्पर्धेत भाग घेते आणि बक्षीसही मिळविते ही बाब आख्या महाराष्टात मीडिया द्वारे प्रसिध्द झाली. त्यांना मोठ्या स्वरुपात मदतही मिळाली व कुंकूसाठी त्यांनी घेतलेली धाव यशस्वी झाली.

पतीच्या उपचारासाठी धावलेल्या लता करे यांना आता आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाव घेतली.