पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा पिसाळलेल्या अस्वलानं दोन तरुणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडलीय.

Updated: Sep 6, 2016, 09:15 PM IST
पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी title=

बुलडाणा : जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा पिसाळलेल्या अस्वलानं दोन तरुणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडलीय.

डोंगरशेवली इथले बबन चव्हाण आणि छगन चव्हाण हे दोघे भाऊ बाईकवर शेतामध्ये जात असताना अचानक पिसाळलेल्या अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी दोघा भावांनी दहा ते पंधरा मिनिटं अस्वलासोबत झुंज दिली. 

आरडा-ओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाल्यानं अस्वलानं पळ काढला. परंतु अस्वलाच्या हल्ल्यात छगन नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय. दोघांनाही बुलडाणा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 

याआधी अस्वलानं केलेल्या हल्ल्यात डोंगरशेवलीमधल्याच ६५ वर्षीय मोहम्मद शहा बिबन शहा यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा नातू जखमी झालाय. 

दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाची तोडफोड करून निषेध नोंदवला आहे.