बेळगाव : बेळगावातील ९५ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उद्धघाटन सोहळ्याला दांडी मारली आहे.
यावेळी संमेलनस्थळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, आणि घोषणाबाजी केली आहे.
घोषणाबाजी वाढल्यानंतर आयोजकांनी घोषणाबाजी करणाऱ्या सीमावासियांची कार्यक्रमात शांतता रहावी म्हणून समजूत काढली आहे. या नंतर मात्र कार्यक्रमात शांतता दिसून आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.