सावनेर: मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
लाटकर यांनी 14 जुलैला सावनेर इथल्या बसस्थानकाजवळ असलेल्या अका दुकानातून 'माझा'ची बाटली खरेदी केली. दोन घोटातचं त्याना चवीत फरक असल्याचं जाणवलं. 'माझा'ची बाटली व्यवस्थित निरखून पाहिल्यावर मात्र त्यांना धक्का बसला.
त्या बाटलीत त्याना एक मेलेला मुंगळा दिसला. यावर त्यांनी दुकानदाराला जाब विचारला असता दुकानदारानं कंपनीविरूद्ध तक्रार करण्यास सांगितलं. यानुसार लाटकर यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले पण पोलिसांनी त्यांना अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार करण्यास सांगितलं.
15 जुलैला सकाळीचं लाटकर यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली. त्या शीतपेयामुळं लाटकर यांना ताप चढला आहे. प्रशासनानं तात्काळ याविरोधात कारवाई करावी असं वक्तव्य चंदू लाटकर यांनी केलं आहे. माझा हे शीतपेय कोकाकोला या कंपनीचं उत्पादन आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.