मुंबई : आजारी व्यक्तींना लवकरात लवकर उपचार मिळावा, यासाठी राज्यात आता लवकरच मोटारसायकल / बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरु केली जाणार आहे.
अपघात झाल्यानंतर अॅम्ब्युलन्सला घटनास्थळी पोहचेपर्यंत ट्राफिकमुळे अनेकदा उशीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अपघात झाल्यानंतर अॅम्ब्युलन्स पोहचण्याअगोदर घटनास्थळी दाखल होऊन जखमींना प्रथमोपचार देण्याची जबाबदारी या 'बाईक अॅम्ब्युलन्स'वर असणार आहे.
'बाईक अॅम्ब्युलन्स'मुळे 'गोल्डन अवर' नाही तर 'गोल्डन मिनिट' ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास आरोग्य विभागाला वाटतोय.
आरोग्य विभागानं ही घोषणा केलीय. यासाठी कंत्राटी तत्त्वावर विज्ञान शाखेचे पदवीधर तसंच प्रथमोपचार प्रशिक्षित नेमण्यात येतील. तसंच पहिल्यांदा सुमारे १०० प्रशिक्षित बाईकचा ताफाही तयार करण्यात येणार आहे.
राज्यात ही सेवा सुरु होणार असली तरी पहिल्यांदा मुंबईत प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली जाईल. दिवाळीनंतर ही योजना सुरु करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.