पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर इथं होंडा सिटी कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर होंडा सिटी चालकानं पोबारा केला. 

Updated: Aug 5, 2015, 12:19 PM IST
पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं

इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर इथं होंडा सिटी कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर होंडा सिटी चालकानं पोबारा केला. 

दरम्यान, मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय. पुणे-सोलापूर महामार्ग गेल्या दीड तासापासून त्यांनी रोखून धरलाय. त्यामुळं वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.