मनमाडात बाईकस्वाराचा भयानक स्टंट

मनमाडमध्ये एका तरुणाचा स्टंट पहायला मिळाला. हा तरुण काय करामती करतोय, यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हा थरार अंगावर अक्षरश: काटा आणतो.

Updated: Jun 4, 2015, 12:43 PM IST
मनमाडात बाईकस्वाराचा भयानक स्टंट title=

मनमाड : मनमाडमध्ये एका तरुणाचा स्टंट पहायला मिळाला. हा तरुण काय करामती करतोय, यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हा थरार अंगावर अक्षरश: काटा आणतो.

हा कुठल्या सिनेमातला स्टंट नव्हे. तर तो आहे मालेगावमधला. भगवान फरस तथा भगतसिंग हा मालेगावमधल्या टोकडे गावातला दुग्ध व्यवसायिक. दररोज दुधाच्या कॅन घेऊन तो टोकडे ते मालेगाव असं २० किलोमीटरचं अंतर पार करतो. वेगळं काही तरी करण्याच्या उद्देशातून त्यानं असे स्टंट करायला सुरुवात केली.

खरं तर असे स्टंट करणं कायद्यानं गुन्हा आहे. मात्र मालेगावमध्ये सध्या चर्चा आहे ती भगवानची आणि त्याच्या स्टंटची.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.