जळगावात भाजपची पिछेहाट, त्रिशंकू परिस्थिती

जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय. भाजपचा हा बालेकिल्ला आहे. पण इथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 

Updated: Apr 23, 2015, 10:15 PM IST
जळगावात भाजपची पिछेहाट, त्रिशंकू परिस्थिती title=

जळगाव : जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय. भाजपचा हा बालेकिल्ला आहे. पण इथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 

१८ पैकी भाजपला ८ जागा तर राष्ट्रवादीला ५ जागा शिवसेनेला १ तर अपक्षांनी ४ जागांवर बाजी मारलीय. अपक्षांच्या मदतीनं भाजपच  सत्ता स्थापन करेल असा दावा जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी संकेत दिलेत. मात्र भाजप सत्तास्थापनेसाठी प्रय़त्न करत असली तरी ५ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील आहे.

भाजपला रोखण्यासाठी अपक्ष आणि शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस दावा करणार आहे. यासाठी वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरु असल्याचं स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय. यामुळे आता अपक्षांचा भाव वधारलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.