रणसंग्राम 0

औरंगाबाद महापौराचा तिढा कायम, बैठकीत तोडगा नाही

औरंगाबाद महापालिका महापौरपदाचा तिढा सुटण्याची काही चिन्हं अजून दिसत नाहीत. याच मुद्यावर सकाळी मुंबईत युतीची बैठक झाली. मात्र बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहे दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. 

Apr 25, 2015, 04:17 PM IST

भाजप सदस्य नोंदणीची पोलखोल

औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. निम्म्या सदस्यांनीसुद्धा भाजपवर विश्वास दाखवलेला नाही.

Apr 24, 2015, 07:47 PM IST

औरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा, शिवसेनेला अमान्य

औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.

Apr 24, 2015, 06:44 PM IST

पालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी

महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय.  यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे. 

Apr 23, 2015, 11:04 PM IST

भाजपचे किसन कथोरे यांच्या गडात सेनेचा भगवा

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता काबिज केलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने विशेषतः आमदार किसन कथोरे यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती. 

Apr 23, 2015, 10:44 PM IST

अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?

भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.

Apr 23, 2015, 10:31 PM IST

२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान

अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे. 

Apr 23, 2015, 10:22 PM IST

जळगावात भाजपची पिछेहाट, त्रिशंकू परिस्थिती

जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय. भाजपचा हा बालेकिल्ला आहे. पण इथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 

Apr 23, 2015, 10:15 PM IST

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता

 अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे. 

Apr 23, 2015, 08:19 PM IST

गणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.

Apr 23, 2015, 07:58 PM IST

औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा भगवा

 औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा शिवसेना भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे. सुरूवातीला जोरदार मुसंडी मारणा-या शिवसेना-भाजपच्या युतीचा वारू ५१ जागांवर थांबला. त्यामुळं युती स्पष्ट बहुमतापासून सहा जागा दूर राहिली. 

Apr 23, 2015, 07:50 PM IST

सत्तेत सहभागी होण्याचे काँग्रेसला गणेश नाईक यांचे आवाहन

पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.

Apr 23, 2015, 05:47 PM IST

#रणसंग्राम : नवी मुंबईत नणंदेने भावजयला केले पराभूत

महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणेश नाईक कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे हिने विजय मिळवला.

Apr 23, 2015, 04:44 PM IST

नवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी

नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.

Apr 23, 2015, 03:44 PM IST

#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले

नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये  चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात  दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत. 

Apr 23, 2015, 03:42 PM IST