अवतरलाय मांसाहारी भक्तांचा ‘बोंबल्या विठोबा’!

रायगड जिल्ह्यात पारंपरिक साजगावची यात्रा भरली आहे. कार्तिकी एकादशीला सुरु होणारी ही यात्रा सलग पंधरा दिवस भरत असते. संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे. 

Updated: Nov 8, 2014, 06:01 PM IST
अवतरलाय मांसाहारी भक्तांचा ‘बोंबल्या विठोबा’! title=

रायगड : रायगड जिल्ह्यात पारंपरिक साजगावची यात्रा भरली आहे. कार्तिकी एकादशीला सुरु होणारी ही यात्रा सलग पंधरा दिवस भरत असते. संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे. या यात्रेला ‘बोंबल्या विठोबा’ची यात्रा असंही म्हणतात. सुकी मासळीसाठी साजागावाची यात्रा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. 

पावसाला संपला की कोकणात विविध गावांमध्ये यात्रा भरत असतात. रायगड जिल्ह्याच्या खोपोली जवळ असणाऱ्या साजगावातही यात्रा भरली आहे. ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात झाली. पंधरा दिवसांची ही यात्रा असते. संत तुकाराम महाराज घाट माथ्यावरून कोकणातील या यात्रेत मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी येत असंत, असं सांगितलं जातं. 

शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या साजागावाच्या यात्रेत सुकी मासळी आणि बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला दिसतो. बोंबील मासळीला प्रचंड मागणी असल्याने ‘बोंबल्या विठोबाची यात्रा’ असेही काही लोक या यात्रेला म्हणतात. 

बैलबाजार हे देखील यात्रेचे वैशिष्ट्यं आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागातून जातिवंत जनावरे विक्रीसाठी ठेवण्यात आलीत. परंतु कोकणात शेती व्यवसाय कमी झाल्याने बैल बाजारावर मंदीचे सावट आहे. या यात्रेतील जिलेबी चांगलीच प्रसिद्ध आहे. 

खोपीलीचा सर्व परीसर औद्योगिककरणानं गजबजलेला असला तरी पारंपरिकता जपत ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.