बुलडाणा : जेईई परीक्षेत ३४६ मार्क मिळाल्याचा आलेल्या मेलच्या आधारे बुलडाणा जिल्ह्यातील आशिष गवई या विद्यार्थ्याने आपण अव्वल असल्याचा दावा केला होता. परंतु सदर विद्यार्थ्याला ३४६ मार्क नसून त्याला ११ मार्क असल्याचे पुरावे अकोला येथील एका शिक्षकाने सादर केले. त्यामुळे त्याचे टॉपरचे भांडे फुटले.
आशिष गवई हा बोगस असल्याचा दावा एका शिक्षकाने केला. परंतु आपण बोगस नसून जेईई संचालकांच्या नावानं आपल्याला आलेल्या मेलच्या आधारे आपण तो दावा केला होता. उलट या प्रकरणात आपण कोणाचीही फसवणूक केलेली नसून आपलीच फसवणूक झाली असल्याचं आशिष गवई यानं म्हटलं आहे.
आपल्याला व्हेरिफिकेशन कोड देखील जेईईकडून प्राप्त झाला असून आपण अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे ११ मार्कावर जेईई अडव्हान् साठी मी पात्र कसा काय झालो, अशा सवाल आशिषने केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.