पुणे : बारामती बॅंकेचे संचालक आदेश वडूजकर यांचं पद रद्द झाले आहे. निवडणुकीत खोटं शपथपत्र दाखल केल्यानं हे पद रद्द झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
आदेश वडूजकर यांचं संचालक पद रद्द करण्याचा निर्णय सहकार आयुक्तांनी दिला आहे. बारामती नगर परिषदेचे नगरसेवक जयसिंग देशमुख यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांनी हा निर्णय दिला आहे.
बारामती सहकारी बॅंकेवर एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना धक्का मानला जात आहे. बारामतीची सहकारी बॅंकेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, वडूजकर यांच्या खोट्या शपथपत्रामुळे पवार यांची अडचण वाढली आहे.