गोंदीया : पाचशे हजाराच्या नोटाबंदीनंतर सरकार शहराप्रमाणेत ग्रामीण भागात सुध्दा कॅशलेस प्रणालीवर भर देत आहे. तर ग्रामीण भागातसुध्दा कॅशलेस व्यवहार व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कॅशलेस व्यवहारासाठी औषध विक्रेत्यांनी आता एक पाऊल पुढे टाकलंय. गोंदीया शहरात कॅशलेस व्यवहारासंबंधी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
तर या कार्यशाळेत रुग्णांच्या नातेवाईकांना सोप्या पद्धतीने बिलाची रक्कम साध्या मोबाईलच्या माध्यमातून भरणा करता येईल याबद्दलची माहिती दिली.