कडोंमपा महापालिकेत शिवसेना-भाजपची कुरबुर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपने युती केली आहे, तरी या दोन्ही पक्षातल्या कुरबुरू सुरूच आहेत हे स्पष्ट होतंय. सफाई कामगारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप असा वाद पुन्हा निर्माण झालाय. 

Updated: Nov 23, 2015, 11:24 PM IST
कडोंमपा महापालिकेत शिवसेना-भाजपची कुरबुर title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपने युती केली आहे, तरी या दोन्ही पक्षातल्या कुरबुरू सुरूच आहेत हे स्पष्ट होतंय. सफाई कामगारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप असा वाद पुन्हा निर्माण झालाय. 

महापालिका आयुक्त ई. रविंद्रन यांनी हजेरी शे़डवर धाड टाकून गैरहजर असलेल्या २४ सफाई कामगारांसह एका आरोग्य निरीक्षकावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र शासकीय किंवा निमशासकीय कामगार कर्मचारी यांना सेवेतून निलंबित करायचं असल्यास, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 तसंच महाराष्ट्र प्रांतिक महानगर पालिका अधिनियम 1949 मधील तरतुदींप्रमाणे कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते. 

यानुसार बाजू मांडण्याची संधी देऊन मग कारवाई करावी लागते, त्यामुळे हे निलंबन नियमबाह्य आहे ते रद्द करावं अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलीय. तर भाजप आमदार कपिल पाटील यांनी आयुक्तांच्या कारवाईची पाठराखण केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.