नागपूर : नागपूरच्या हल्दीराम या खाद्य कंपनीला अन्न व औषध प्रशासनाकडून दिलासा मिळालाय. कंपनीच्या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे शिसाचे प्रमाण हे योग्य असल्याचा निर्वाळा अन्न व औषध प्रशासनानं दिलाय.
मॅगीवर बंदी आली असतानाच हल्दीराम कंपनीच्या खाद्य पदार्थांमध्येही शिसाचं प्रमाण जास्त असल्याची ओरड होत होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचं आढळल्याचं आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केलंय.
तपासणीसाठी हल्दीराम भुजिया, नवरत्न मिक्स, आलू चिप्स, सोनपापड़ी, मूग डाळ अशा अनेक पदार्थांचे नमुने घेण्यात आले होते. चाचणीसाठी एकूण २० नमुने घेण्यात आले होते. यातील १४ नागपूरमधून तर ६ मुंबईतून घेतले गेले होते. सर्व गोष्टींमध्ये निर्धारीत प्रमाणातच शिसं आढळल्याचं म्हटलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.