...जेव्हा वादग्रस्त तुरुंगात मुख्यमंत्री अचानक होतात दाखल!

काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं नागपूरचं मध्यवर्ती कारागृह आज पुन्हा चर्चेत आलं. कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक केलेला कारागृहाचा दौरा. 

Updated: Apr 20, 2015, 11:19 PM IST
...जेव्हा वादग्रस्त तुरुंगात मुख्यमंत्री अचानक होतात दाखल! title=

नागपूर: काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं नागपूरचं मध्यवर्ती कारागृह आज पुन्हा चर्चेत आलं... कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक केलेला नागपूर सेंट्रल जेलचा दौरा...

मुख्यमंत्र्यानी कोणतीही पूर्व सूचना न देता कारगृहाला दिलेल्या भेटीने कारागृह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या या धावत्या आढाव्याची माहिती दिलीय. ‘नुकतीच नागपूर मध्यवर्ती कारागृहाला सरप्राईज भेट दिली. कारागृहामध्ये अनेक सुधारणा आवश्यक आहेत’ असं ट्विट मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. 

Just paid a surprise visit to Central Jail,Nagpur. A lot still needs to be done.Entire jail admin requires a revamp. pic.twitter.com/cts4h25uxv

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 20, 2015

नागपूर विमातळावर उतरताच मुख्यमंत्र्यानी नियोजित ठिकाणी न जाता थेट नागपूर मध्यवर्ती कारागृह गाठले. त्यामुळे कारागृह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

काही दिवसांपूर्वी या कारागृहातून पाच आरोपी फरार झाले होते... त्यानंतर तुरुंगाच्या परिसरात असलेल्या विहिरीमध्ये अनेक मोबाईलदेखील सापडले होते. कारागृहातून फरार झालेल्या आरोपींना मदत करणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींनाही लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.