औरंगाबाद : विधानसभा आपण दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. विलासकाका उंडारकर हे काँग्रेस आमदार अनेक वर्षांपासून दक्षिण कराडमधून निवडून येतात, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना हा मतदारसंघ दिल्यास आपण बंडाचे निशाण फडकवू असा इशारा विलासकाका उंडारकर यांनी दिल्याने, मुख्यमंत्र्यांसमोर एक पेच निर्माण झाला आहे,
अशाही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून लढण्याचे संकेत दिले आहेत, यावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी कोठून निवडणूक लढणार हे योग्यवेळी जाहीर होईल. कसं आहे शेवटी मी कराडला राहतो. दक्षिण कराड हा माझा मतदारसंघ आहे. मी कुठे दुसरीकडे जाणार नाही. या सर्व परिस्थितीची कल्पना मी श्रेठींनी सांगितलेली आहे. अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेईल", असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
स्वतंत्र लढण्याची वेळ आली, तर काँग्रेस सक्षम असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सहकारी पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आघाडी होईल. स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास कॉंग्रेस सक्षम आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.